ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ व्यवसाय सामाजिक

पिंपरी चिंचवड जैन महासंघाचा सामूहिक क्षमापना कार्यक्रम कौतुकास्पद – परमपूज्य सुप्रियादर्शनाजी म. सा.

पिंपरी चिंचवड जैन महासंघाचा सामूहिक क्षमापना कार्यक्रम कौतुकास्पद – परमपूज्य सुप्रियादर्शनाजी म. सा.

 

उमेश सणस
पिंपरी : चिंचवड गाव येथील कल्याण प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये पिंपरी चिंचवड जैन महासंघ आणि श्री वर्धमान स्थानक वासी जैन श्रावक संघ चिंचवडगाव, कल्याण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी जैन धर्मातील सर्व संप्रदायातील श्रावक श्राविका आणि साध्वीजी यांचा सामूहिक क्षमापना कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांचा शुभारंभ प. पू. विनितयशाश्रीजी म. सा. यांच्या मंगलाचरणाने झाला. जैन महासंघाचे अध्यक्ष श्रेयस अशोककुमार पगारिया यांनी महासंघाच्या स्थापनेपासूनच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. दरवर्षीप्रमाणे सर्व संप्रदायातील श्रावक, श्राविका यांचा एकत्रित असा सामूहिक क्षमापना कार्यक्रम यावर्षी चिंचवडगाव येथील श्रावक संघाच्या सहकार्याने, साध्वीजी परमपूज्य पुष्पचूलाजी म. सा. परमपूज्य सुप्रिया दर्शनाजी म सा ,परमपूज्य नियम दर्शनाजी म सा, परमपूज्य विनीत यशाश्रीजी म सा आदी साध्वीजींच्या मंगलमय सानिध्यात हा कार्यक्रम पार पडला.
महेंद्र शिंगी यांनी जैन एकतेवरील गीत सादर केले. यावेळी बोलताना प पू सुप्रिया दर्शनाजी यांनी पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या सर्वच कार्याबद्दल आणि विशेषतः सामूहिक क्षमापना कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढले. सर्व संप्रदायातील संत आणि साध्वीजीं यांना एकाच मंचावर आणून सर्व संप्रदायातील श्रावक श्राविका यांचा एकत्रितपणे क्षमापना कार्यक्रम संपन्न गेली. अनेक वर्षापासून करत आहेत ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. जैन धर्मामध्ये क्षमापना पर्वाला फार मोठे महत्त्व आहे. आपले ज्यांच्याशी काही कारणामुळे वैर निर्माण झालेले आहे बोलचाल बंद आहे अशा लोकांची क्षमा मागून त्यांच्याशी पुन्हा स्नेहाचे आणि सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करणे हा क्षमापना पर्वाचा उद्देश आहे. या दिवशी सर्व मतभेद विसरून एकत्र येण्याची आवश्यकता आहे. महासंघाच्या या कार्यक्रमामुळे जैन एकता प्रस्थापित होण्यास फार मोठी मदत होत आहे.
यावेळी प पू नियम दर्शनाजी म सा यांनीही जैन एकतेचे स्तवन गाऊन कार्यक्रमामध्ये मंगलमय वातावरणाची निर्मिती केली. त्या म्हणाल्या- प्रथम आपण जैन आहोत आणि नंतर व्यवस्थेनुसार संप्रदायांमध्ये आहोत. त्यामुळे जैन समाजामध्ये एकी प्रस्थापित होण्यासाठी अशा कार्यक्रमाची निश्चितपणे आवश्यकता आहे. जैन महासंघाच्या सर्वच उपक्रमांबरोबर सामूहिक क्षमापनाचा उपक्रम निश्चितपणे स्तुत्य आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
चिंचवडगाव जैन श्रावक संघाचे अध्यक्ष नंदकुमार लूनावत यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. शहर अभियंता या पदावर पदोन्नती झालेल्या मनोज शेठीया यांचा श्रावक संघाच्या वतीने सन्मान केला. जैन महासंघाच्या वतीनेही महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया व सर्व पदाधिकाऱ्यांनी शेठिया साहेबांचा सन्मान केला. जैन श्रावक संघाचे मयूर शिंगवी यांनी सूत्रसंचालन केले. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी समोर उभे राहून क्षमा याचना संदेशाचे वाचन केले. सर्वांची क्षमा याचना केली. सर्व उपस्थितांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन एकमेकांची क्षमा याचना केली. या कार्यक्रमासाठी जैन समाजातील सर्व संप्रदायातील श्रावक श्रावीका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जैन महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया, निवर्तमान अध्यक्ष उमेश पाटील, कार्याध्यक्ष विजय भिलवडे, महामंत्री संदीप फुलफगर, कोषाध्यक्ष नेनसुख मांडोत, उपाध्यक्ष श्रेणिक मंडलेचा, मंत्री वीरेश छाजेड, सह कोषाध्यक्ष तुषार मुथा यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमांमध्ये महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक कुमार पगारिया, माजी अध्यक्ष नितीन बेदमुथा, विलास पगारिया, प्रकाश कटारिया, सुर्यकांत मुथियान आणि वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप भन्साळी, प्रकाश गदिया, राजेंद्र कर्नावट, प्रा सुरेश धाडीवाल, रमणलाल शिंगवी, प्रकाश बंब जितो, अध्यक्ष संतोष चंगेडिया जैन सोशल ग्रुप अध्यक्ष मयूर पगरिया, अनुप नहार, रवींद्र बलाई, राजेंद्र मुनोत, महासंघाचे कार्यकारिणी सदस्य हर्षद लुंकड, स्नेहल भंडारी, शुभम कटारिया, विकास नवले, सचिन कोगनाळे, अमोल शिरगावे, अभिनंदन छाजेड तसेच चिंचवडगाव येथील जैन श्रावक संघाचे माजी अध्यक्ष अशोकजी बागमार, राजेंद्रजी जैन, राजेंद्रजी मुथा, नाशिक येथील जे, सी, भंडारी तसेच प्रा सुरेखा कटारिया, सौ लता पगारिया, कविता शेठिया ,लिना कटारिया, श्रुती पगारिया ,अनिता नहार आणि विविध जैन संघाचे अध्यक्ष, जैन कॉन्फरन्सचे पदाधिकारी ,महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *