गुन्हेगारी ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण वाहतूक व्यवसाय सामाजिक

गणेश विसर्जन मिरवणुकदरम्यान गणेश मंडळांवर कारवाई

गणेश विसर्जन मिरवणुकदरम्यान गणेश मंडळांवर कारवाई

 

१० गणेश मंडळानी उच्च क्षमतेचे डि.जे., डॉल्बी साऊंड सिस्टीम लावुन ध्वनी प्रदुषण केले

 

सांगवी पोलिसांचा दणका

उमेश सणस
पिंपरी : सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, आयुक्तालय यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत सण उत्सव व सार्वजनिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी उच्च क्षमतेचे डीजे, डॉल्बी साउंड सिस्टीम व ध्वनी प्रदुषण करणारी साधने वापरण्यास बंदी घातली आहे. त्याबाबत वेळोवेळी आम्ही स्वतः व वरिष्ठांनी गणेश मंडाळाचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांसोबत मिटिंग घेऊन त्यांना लेखी स्वरुपात सुचना दिल्या आहेत. परंतु सांगवी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सातव्या दिवसाचे एकुण ९० गणेश मंडळाचे विसर्जन मिरवणुका होती. त्यापैकी ९ ते १० गणेश मंडळानी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान उच्च क्षमतेचे डि.जे., डॉल्बी साऊंड सिस्टीम लावुन ध्वनी प्रदुषणा केल्याचे आढळुन आल्याने सदर मंडळाचे एकुण ०५ डि.जे.मिक्सर, ०३ डि.जे. कन्सिल, ०१ लाईट कंट्रोल प्रेशिन, ०३ लॅपटॉप, ०१ स्पिकर व ०१ डि.जे. सेट (ट्रॅक्टर, ट्रॉली व स्पिकरसह) मुद्देमाल ताब्यात घेतला असुन एकुण ०९ गणेश मंडळांचे अध्यक्ष व डि.जे. मालक तसेच चालक यांचेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ संदिप आटोळे, सहा. पोलीस आयुक्त, सांगवी विभाग मनिषा कदम, यांचे मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेन्द्र कोळी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नांदेकर, सहा. पोलीस निरीक्षक माळेगावे, सहा. पोलीस निरीक्षक पाटील, सहा. पोलीस निरीक्षक बोराडे, पोलीस उपनिरीक्षक भालेराव, पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक जावळे, पोलीस उपनिरीक्षक आकमवाड, पोलीस उपनिरीक्षक बाराते, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, परि. मपोउनि जाधव, पोलीस हवा, ८५४ सांळुखे, मपोहवा, १२०३ फाळके, पो. शि. २५४५ आहेर व तपास पथकातील अंमललदार यांनी केली आहे.
श्री गणेशोत्सव २०२६ चे कालावधीत व गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोणत्याही गणेश मंडळाने उच्च क्षमतेचे डि.जे. डॉल्बी साऊंड सिस्टीम लावुन ध्वनी प्रदुषण करु नये, सदर सुचनांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर कोणतीही पुर्वसुचना न देता कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच संबधित डि.जे., डॉल्बी साऊंड सिस्टीम, डि.जे.मिक्सर, डि.जे. कन्सिल जप्त करण्यात येईल, या कारवाईस संबंधित मंडळाचे पदाधिकारी व आयोजक हे स्वतः जबाबदार राहतील याची सर्व गणेश मंडळांनी नोंद घ्यावी.
– संदिप आटोळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १, पिंपरी चिंचवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *