आरोग्य ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ शिक्षण सामाजिक

स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रम

स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रम

स्वच्छता, जनजागृतीसह नागरिकांच्या सहभागावर महापालिकेचा भर

उमेश सणस
पिंपरी : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने १७ ऑक्टोबरपर्यंत शहरात विविध स्वच्छता व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ‘स्वच्छ भारत, विकसित भारत’ ही यंदाच्या अभियानाची संकल्पना आहे. स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी असून, त्यामध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे.
या अभियानांतर्गत शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, परिसर स्वच्छता, शाळांमध्ये जनजागृती, स्वच्छता शपथ, मानवी साखळी यांसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. स्वच्छ पाठशाळा, सफाई मित्रांसाठी उपक्रम, नागरिक सहभाग तसेच, टाकाऊ वस्तूंचा कलात्मक पुनर्वापर करून सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण या बाबींवरही विशेष भर देण्यात येत आहे.
कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करताना ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य अशा चार प्रकारे कचऱ्याचे विलगीकरण करून तो महापालिकेच्या कचरा संकलन यंत्रणेकडे देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता तो महापालिकेच्या घंटागाडीला द्यावा त्याचबरोबर, परिसर स्वच्छ ठेवण्याबाबतही विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे.
स्वच्छता ही केवळ अभियानापुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग होणे आवश्यक असून, ‘स्वच्छता ही सेवा २०२६’च्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घराघरापर्यंत पोहोचविण्यासोबतच नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर महापालिकेचा भर आहे. स्वच्छ, सुंदर आणि निरोगी पिंपरी चिंचवडच्या निर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारावी.
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.
स्वच्छ आणि निरोगी शहरासाठी नागरिकांनी दैनंदिन जीवनात स्वच्छतेच्या सवयी रुजविणे आवश्यक आहे. कचऱ्याचे योग्य विलगीकरण करणे, तो महापालिकेच्या कचरा संकलन यंत्रणेकडेच देणे तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता परिसर स्वच्छ ठेवणे, ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
– डॉ. प्रदीप ठेंगल, उप आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *