आरोग्य गुन्हेगारी ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ व्यवसाय सामाजिक

भोसरी-लांडेवाडी परिसरात शाळांच्या १०० मीटरमधील तंबाखूजन्य टपऱ्यांवर कारवाई

भोसरी-लांडेवाडी परिसरात शाळांच्या १०० मीटरमधील तंबाखूजन्य टपऱ्यांवर कारवाई

उमेश सणस
पिंपरी : शाळांच्या परिसरात विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थ सहज उपलब्ध होऊ नयेत, यासाठी महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत तंबाखूजन्य पदार्थविक्री करणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. भोसरी-लांडेवाडी परिसरातील शाळांच्या १०० मीटर परिसरात ही कारवाई करण्यात आली.
शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करून संबंधितांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून अशा प्रकारची कारवाई पुढेही सुरू राहणार आहे.
‘ल’क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या अनधिकृत टपऱ्या आढळल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *