ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण सामाजिक

कासारवाडीतील रेल्वे फाटक बंद न करता अंडरपासचा पर्याय

कासारवाडीतील रेल्वे फाटक बंद न करता अंडरपासचा पर्याय

पर्यायी मार्गासाठी प्रत्यक्ष पाहणी; अधिकाऱ्यांना नियोजनाच्या सूचना

उमेश सणस
पिंपरी : कासारवाडी येथील रेल्वे फाटक क्रमांक ६१ बंद करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर फाटक बंद करण्यापूर्वी नागरिकांच्या ये-जा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची भूमिका मांडण्यात आली आहे.
कासारवाडी रेल्वे फाटक परिसराची गुरुवारी (३ सप्टेंबर) प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिकांच्या अडचणी वाहतुकीची परिस्थिती आणि फाटक बंद झाल्यास निर्माण होणाऱ्या संभाव्य समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. नागरिकांची नियमित ये-जा सुरळीत राहावी यासाठी पर्यायी मार्ग तसेच रेल्वे अंडरपासच्या शक्यतेचा विचार करून आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
कासारवाडीतील सुमारे २५ हजारांहून अधिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि दैनंदिन ये-जा करण्याच्या सुविधेचा विचार करून रेल्वे फाटक बंद न करता RUBउभारण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात येईल असे आश्वासन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी दिले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. रेल्वे फाटक बंद करण्याचा कोणताही निर्णय घेताना स्थानिक नागरिकांची सोय सुरक्षितता आणि वाहतुकीचा प्रश्न यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याची भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली. पर्यायी मार्गाची ठोस व्यवस्था झाल्याशिवाय फाटक बंद करू नये, अशी नागरिकांचीही भूमिका आहे.
या पाहणीवेळी रेल्वे विभागाचे शुभम निकम पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता विजय भोजने, सहशहर अभियंता प्रेरणा शिनकर, माजी नगरसेवक शाम लांडे, नगरसेविका मनीषा लांडे, प्रतीक्षा जवळकर, प्रकाश जवळकर, माजी नगरसेवक दत्तोबा लांडगे, माजी नगरसेवक किरण मोटे, देवदत्त लांडे, सागर पाचारणे, निलेश लांडे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

कासारवाडी रेल्वे फाटकाचा प्रश्न पुन्हा चर्चेत

कासारवाडी रेल्वे फाटकाचा प्रश्न गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. फाटक बंद झाल्यास नागरिकांना मोठ्या अंतराचा फेरा मारावा लागू शकतो. त्यामुळे फाटक बंद करण्याऐवजी त्याच ठिकाणी किंवा योग्य पर्यायी ठिकाणी Rail Under Bridge उभारून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. आता या मागणीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष पाहणी झाल्याने RUBच्या प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली, ही समाधानाची बाब आहे. त्यांनी रेल्वे प्रशासनाशी पाठपुरावा करून नागरिकांच्या मागणीला न्याय मिळवून द्यावा आणि तातडीने ROBअथवा RUB मंजूर करून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा. पूल पूर्ण होईपर्यंत फाटक सुरू ठेवण्यासाठीही योग्य तो निर्णय घ्यावा. कासारवाडीच्या नागरिकांच्या हितासाठी आम्ही या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करत राहू.
– प्रतीक्षा राजेंद्र लांघी-जवळकर, नगरसेविका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *