आरोग्य
ताज्या बातम्या
मुख्यपृष्ठ
राजकारण
सामाजिक
महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते पवना धरणावर जलपूजन
- September 5, 2026
- Less than a minute
- 20 Views
- 3 weeks ago
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला वर्षभर पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाने पूर्ण क्षमतेने पाणीसाठा गाठल्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पारंपरिक पद्धतीने जलपूजन करण्यात आले. महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते जलपूजन करून जलदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या वेळी शहराला वर्षभर पुरेसा, नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी प्रार्थना करण्यात आली.
जलपूजनाच्या निमित्ताने जलस्रोतांचे संवर्धन, पाण्याचा काटकसरीने वापर, नदीपात्राची स्वच्छता आणि जलपरिसराचे संरक्षण करण्याचा संकल्प करण्यात आला. पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून शहराच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची गरज असल्याने उपलब्ध जलसाठ्याचे जतन करणे आणि त्याचा योग्य वापर करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
Share This Post:
Related Post
भोसरी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात
September 26, 2026
रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणाईसाठी “रोजगार महाकुंभ!”
September 26, 2026
पिंपरी चिंचवड मधील कलावंतांची गणेशोत्सवानिमित्त बालगीतांची विशेष निर्मिती
September 26, 2026
कामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
September 26, 2026
शहरात आतापर्यंत ६३ मंडळांवर गुन्हे दाखल
September 24, 2026
स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रम
September 24, 2026