ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ सामाजिक

ताथवडे, वाकड हद्दीवरील सुखदा कॉलनी भागात अनधिकृत विद्युत पंपांवर कारवाई

ताथवडे, वाकड हद्दीवरील सुखदा कॉलनी भागात अनधिकृत विद्युत पंपांवर कारवाई

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे १५ मोटारी जप्त

उमेश सणस
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ज प्रभागातील पाणीपुरवठा विभागातर्फे (दि. १ सप्टेंबर) सुखदा कॉलनी येथील भागात कारवाई करण्यात आली. मनपाच्या जलवाहिनीला थेट विद्युत पंप जोडून बेकायदेशीररीत्या पाणी उपसा करणाऱ्या एकूण १५ मोटारी जप्त करण्यात आल्या.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने वारंवार सांगूनही नागरिक थेट जलवाहिनीला विद्युत पंप जोडत आहेत. यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा करताना समस्या येत आहेत. तरी शहरातील नागरिकांनी थेट जलवाहिनीला विद्युत पंप न जोडत पाणी घ्यावे. यामुळे सर्व नागरिकांना पाणी मिळेल. जर थेट जलवाहिनीला विद्युत पंप जोडले तर कारवाई होत राहणार आहे. ही कारवाई पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता प्रवीण धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी कनिष्ठ अभियंता अमरजीत मस्के, जय कानडे, मनपाचे कर्मचारी, सदा बिरड, तुषार कस्पटे, मुकेश भुजबळ, प्लंबर, वालमन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *