ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण व्यवसाय

श्रेयस पतसंस्थेच्यावतीने नृत्य, चित्रकला स्पर्धा उत्साहात

श्रेयस पतसंस्थेच्यावतीने नृत्य, चित्रकला स्पर्धा उत्साहात

उमेश सणस

पिंपरी : श्रेयस पतसंस्थेच्या 24 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त सामाजिक बांधिलकीतून नृत्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विद्यार्थी गुणगौरव सोहळा नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव या ठिकाणी शनिवार (दि. 22) रोजी संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष सतीश मदने व संचालक मंडळ यांच्या हस्ते 70 गुणवंत विद्यार्थी व स्पर्धेतील 12 विजयी विद्यार्थी यांना गौरविण्यात आले.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश मदने म्हणाले की, आमदार कै. लक्ष्मणभाऊ पांडुरंग जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या संस्थेने गेल्या तेरा वर्षापासून विद्यार्थी गुणगौरव सोहळा, दुष्काळग्रस्तांना मदत, वारकऱ्यांना जेवण वाटप, ज्ञानेश्वरी ग्रंथ वाटप, अंध, अपंग मुलांना शालेय वस्तूंचे वाटप, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा, वृक्षरोपण, रक्तदान शिबिरे व महिलांकरिता हळदीकुंकू तसेच या यावर्षी संस्थेने तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सासवड ते पंढरपूर पाणी टँकर सुविधा पुरवली. असे उपक्रम सातत्याने राबवत असल्याचे सांगितले. संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त विशेष उपस्थिती म्हणून नगरसेविका पल्लवीताई जगताप (सदस्य महिला बालकल्याण समिती पिंपरी चिंचवड मनपा), नगरसेवक ज्ञानेश्वर उर्फ माऊलीशेठ जगताप (सदस्य विधी समिती पिंपरी चिंचवड मनपा), श्रमजीवी पतसंस्था अध्यक्ष सूर्यकांत गोफणे, विजयराज पतसंस्था संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, जनहित पतसंस्था चेअरमन मधुकर त्रिभुवन व भाजपा मंडल अधिकारी सांगवीचे गणेश ढोरे उपस्थित होते. संस्थेच्या व्यवस्थापिका सारिका कुलकर्णी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *