ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ शिक्षण

सीए जिनेश पगारिया ह्यांचा सुर्यदत फौंडेशनच्या वतीने विशेष सन्मान

सीए जिनेश पगारिया ह्यांचा सुर्यदत फौंडेशनच्या वतीने विशेष सन्मान

पिंपरी : कासारवाडी, पुणे येथील जिनेश कल्पेश पगारिया हा सीएच्या सर्व परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झाला. त्यानिमित्त सुर्यदत्त फौंडेशनच्या वतीने त्याचा विशेष सन्मान करण्यात आला.
या वेळी जिनेश याचा मानचिन्ह आणि सन्मान पत्र देऊन पुणे येथील शिवशंकर सभागृहात आचार्य प. पू. डॉ. लोकेशमुनिजी म सा, प पू रमणिकमुनिजी म सा आणि प पू हिमानी जी म सा यांच्या मंगल मय सान्निध्यात प्रसिद्ध जेष्ठ अभिनेते रझा मुराद, आचार्य डॉ. लोकेशमुनीजी यांच्या हस्ते आणि सुर्यदत्त‌चे अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया आणि त्याचे दादाजी डॉ. अशोककुमार पगारिया, अध्यक्ष भगवान महावीर एज्युकेशन सोसायटी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
जिनेश पगारिया हा अंतिम परीक्षेसहित सर्व परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला. हे नेत्रदीपक यश त्याने मिळवले आहे. त्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *