तपोधन नागरी सहकारी पतसंस्था मर्या. निगडी शाखा उद्घाटन समारंभ
उमेश सणस
पिंपरी : सर्व सभासदांना व खातेदारांना कळविण्यात आनंद होत आहे की आपल्या पतसंस्थेची दुसरी शाखा निगडी येथे सुरू होत आहे. त्या शाखेचा उद्घाटन समारोह व सत्यनारायण महापूजा मंगळवार (दि ०१) रोजी सायं. ५ वाजता होणार आहे. हा
कार्यक्रम स्नेहा आपर्टमेंट, शॉप नं.०२, निगडी प्राधिकरण, निगडी, पुणे येथे होणार आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहान संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.
शाखेचे उद्घाटन पिंपरी चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, राज्यसभा खासदार अमरजी साबळे, आमदार शंकर जगताप, मा. आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप, शत्रुघन काटे (अध्यक्ष-भाजपा पि.चि. शहर), अण्णा बनसोडे (उपसभापती महा. राज्य), महेशदादा लांडगे (आमदार), उमाताई खापरे (आमदार विधान परिषद), अमीत गोरखे (आमदार विधान परिषद), शर्मिला बाबर (उपमहापौर पिं.चि.मनपा.) उपस्थित राहणार आहेत.
या वेळी बाळासाहेब कोंडिबा लांडे (संस्थापक / चेअरमन), ज्ञानदेव मुरलीधर थोरात (व्हाईस चेअरमन व मा. नगरसेवक), तर संचालक मंडळावर बाबासाहेब रघुनाथ लांडगे, बाळासाहेब महादू जवळकर, संतोष रामचंद्र तळेकर, विकास विठ्ठल विधाते, शिवजी देवजी पटेल, पदमा नामदेव कासकर, अलका भाऊसाहेब दौंडकर तर तज्ञ संचालक सुनिल तथा नाना नाथु लांडगे, रमाकांत विश्वनाथ स्वामी, व्यवस्थापक प्राजक्ता आंगणे. सल्लागार समितीत अॅड बापूसाहेब थोरात, शैलेश गाडे पाटील, पांडुरंग भाईप, रमाकांत लांडगे, गणेश संभेराव, असलम तांबोळी, मोहिनी विठ्ठलराव जगताप उपस्थित राहणार आहेत.