ताज्या बातम्या क्रीडा शिक्षण सामाजिक

सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा स्पर्धांचे आयोजन

सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा स्पर्धांचे आयोजन

पिंपरी : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशालेत 29 ऑगस्ट 2026 रोजी हॉकीचे जादूगार -मेजर ध्यानचंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे मानद सचिव राजेंद्रकुमार मुथा, सहाय्यक सचिव अनिलकुमार कांकरिया, व्यवस्थापक सतीश भारती, प्रशालेच्या प्राचार्या सारंगा भारती व उपमुख्याध्यापिका सुषमा बंब यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व क्रीडा ज्योतीचे पूजनाने करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक शशिकांत हुले यांनी केले. खेळामध्ये दिले जाणाऱ्या विविध पुरस्कारांची व ऑलम्पिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या विविध खेळांविषयीची माहिती दिली. विद्यार्थ्यांसाठी क्रीडा व खेळाचे महत्व सांगताना खेळाच्या माध्यमातून मेहनत, शिस्त, संघभावना व नेतृत्व गुण विकसित होण्यास मदत होत असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमानिमित्त प्रशालेतील विद्यार्थिनींनी मेजर ध्यानचंद यांची वेशभूषा साकारली.
तसेच राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त प्रशालेत बुद्धीबळ, कॅरम व आट्यापाट्या हे खेळ घेण्यात आले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त प्रशालेतील क्रीडा शिक्षकांचा सन्मान करण्यातआला. विद्यार्थिनी मनोगतामध्ये श्रेया रकटे हिने मेजर ध्यानचंद यांचा हॉकी खेळाचा इतिहास स्पष्ट केला. तसेच क्रीडा शिक्षक हरीश शिंदे यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय क्रीडा दिनाची माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन क्रीडाशिक्षक सचिन नाडे यांनी केले. तर आभार शिक्षक प्रतिनिधी सविता ठाकूर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *