ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण सामाजिक

निष्ठा, प्रदीर्घ सेवेचा गौरव ! : माजी आमदार अश्विनी जगताप

निष्ठा, प्रदीर्घ सेवेचा गौरव ! : माजी आमदार अश्विनी जगताप

पिंपरी : कामिनी गार्डन, पिंपळे सौदागर येथे आयोजित विजय (बाप्पू) गोपाळराव ढोरे (फायरमॅन, भारतीय अग्निशामक दल, डिफेन्स फायर सर्व्हिस यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजित करण्यात आला. या वेळी माजी आमदार अश्विनी जगताप प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते फायरमॅन, भारतीय अग्निशामक दल, डिफेन्स फायर सर्व्हिसमध्ये कार्यरत असलेले विजय (बाप्पू) गोपाळराव ढोरे यांचा सन्मान करण्यात आला.
या वेळी माजी आमदार अश्विनी जगताप म्हणाले, आपल्या प्राणांची पर्वा न करता अग्निशामक दलात बजावलेली निष्ठावंत सेवा अत्यंत कौतुकास्पद आहे. या प्रसंगी त्यांच्या प्रदीर्घ सेवेचा सन्मान करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विजय ढोरे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला उत्तम कर्तव्य, आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंदी सेवा निवृत्त जीवनासाठी शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *