ताज्या बातम्या
मुख्यपृष्ठ
राजकारण
सामाजिक
पवना जलवाहिनी प्रकल्पाबाबत सर्व घटकांना विश्वासात घेऊन सकारात्मक तोडगा काढावा – महापौर लांडगे
- September 10, 2026
- Less than a minute
- 15 Views
- 3 weeks ago
उमेश सणस
पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने होणारा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहरासाठी दीर्घकालीन व शाश्वत पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने पवना जलवाहिनी प्रकल्प महत्त्वाचा असून, प्रकल्प पुढे नेताना मावळमधील शेतकरी आणि स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांचाही योग्य विचार होणे आवश्यक आहे. शहराची पाण्याची गरज आणि स्थानिक शेतकऱ्यांचे हित या दोन्ही बाबींमध्ये समन्वय साधून सर्वमान्य मार्ग काढण्याची भूमिका असल्याचे महापौर लांडगे यांनी स्पष्ट केले.
पवना जलवाहिनी प्रकल्प हा पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्याचवेळी मावळमधील शेतकऱ्यांनी मांडलेल्या अडचणी आणि त्यांच्या अपेक्षांचाही संवेदनशीलतेने विचार होणे आवश्यक आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, अशा पद्धतीने सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेऊन सकारात्मक आणि सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावर पुढील बैठक आयोजित करून विषयाला गती देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी चर्चा केली आहे. शहराची दीर्घकालीन पाण्याची गरज पूर्ण करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल.
Share This Post:
Related Post
भोसरी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात
September 26, 2026
रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणाईसाठी “रोजगार महाकुंभ!”
September 26, 2026
पिंपरी चिंचवड मधील कलावंतांची गणेशोत्सवानिमित्त बालगीतांची विशेष निर्मिती
September 26, 2026
कामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
September 26, 2026
शहरात आतापर्यंत ६३ मंडळांवर गुन्हे दाखल
September 24, 2026
स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रम
September 24, 2026