ताज्या बातम्या
मुख्यपृष्ठ
राजकारण
सामाजिक
शहरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा
- September 12, 2026
- Less than a minute
- 20 Views
- 2 weeks ago
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आणि अतिक्रमण मुख्य कार्यालय उप आयुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्व १० क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात आलेल्या या कारवाईत एकत्रितपणे सुमारे ८३ हजार ९९ चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक जागा, रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त ठेवणे तसेच अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध करणे ही महापालिका प्रशासनाची सातत्यपूर्ण जबाबदारी आहे. नागरिकांनी अनधिकृत बांधकामे अथवा अतिक्रमणे करू नयेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. शहराचे नियोजनबद्ध व शिस्तबद्ध स्वरूप कायम ठेवण्यासाठी यापुढेही क्षेत्रनिहाय नियमित कारवाई सुरू राहणार आहे.
Share This Post:
Related Post
भोसरी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात
September 26, 2026
रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणाईसाठी “रोजगार महाकुंभ!”
September 26, 2026
पिंपरी चिंचवड मधील कलावंतांची गणेशोत्सवानिमित्त बालगीतांची विशेष निर्मिती
September 26, 2026
कामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
September 26, 2026
शहरात आतापर्यंत ६३ मंडळांवर गुन्हे दाखल
September 24, 2026
स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रम
September 24, 2026