ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण शिक्षण सामाजिक

“स्नेहबंध”पुरस्कार यंदा प्रकाश जवळकर यांना प्रदान

“स्नेहबंध”पुरस्कार यंदा प्रकाश जवळकर यांना प्रदान

 

उमेश सणस
पिंपरी : लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान पुणे व महात्मा फुले विद्यालय पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा “स्नेहबंध”पुरस्कार यंदा पिंपरी चिंचवड महापालिका सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रकाश जवळकर यांना ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते (दि. ३०) रोजी पिंपरी येथील महात्मा फुले विद्यालयाच्या सभागृहात प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी डावीकडून महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, रयत शिक्षण संस्थेचे उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य शिवलिंग मेनकुदळे, प्रितम प्रकाश विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यु दहीतुले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती हनुमंतराव नेवाळे.
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी मनोजकुमार मारकड, भारत मदने यांनी पुढाकार घेतला. सहभागी सर्व युवक-युवतींना आयोजकांच्या वतीने विशेष ‘सहभाग प्रमाणपत्र’ देऊन गौरवण्यात आले. सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *