नवी सांगवी : श्रीमती कलावती आनंदाराव ओव्हाळ यांच्या अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्था (स्कॉमी), पुणे यांच्या वतीने ‘आई परिवार’ आयोजित आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळीवाजता करण्यात आले आहे. नवी सांगवी येथील निळू फुले नाट्यहात हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे.
समाजासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या कुटुंबासाठीगृ आणि समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात आदर्श माता पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार आणि समाजभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. याशिवाय काव्यगायन, चित्रकला बक्षीस वितरण, मान्यवरांची मनोगते, पुरस्कारार्थींचे मनोगत, विशेष सत्कार आणि अध्यक्षीय भाषण असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
विशेष म्हणजे, स्कॉमी संस्थेच्या वतीने गेल्या १६ वर्षांपासून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जात आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा समाजातील इतरांनाही मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून मान्यवर उपस्थित राहणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुरस्कारार्थींचा उत्साह वाढवावा, असे आवाहन स्कॉमी संस्थेच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून आयोजकांनी सर्वांचे स्वागत केले आहे.