ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण वाहतूक सामाजिक

देहू ते आळंदी मेट्रो सुरू करा

देहू ते आळंदी मेट्रो सुरू करा

नगरसेवक यश साने व चिखली ग्रामस्थाची मागणी

विकासाच्या नव्या मार्गाकडे एक पाऊल!

पिंपरी : देहू ते आळंदी या महत्त्वपूर्ण मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी महा मेट्रोचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रवण हार्डीकर यांची नगरसेवक यश साने व चिखली येथील ज्येष्ठ ग्रामस्थ अमृतआप्पा सोनवणे, प्रदीप भाऊ आहेर, निवृत्ती शेलार, विष्णु मोरे पाटील, बाळासाहेब मोरे, बाळासाहेब साने, मोहन ढोळ, राम भाऊ मोरे यांच्या समवेत भेट घेतली.
या वेळी देहू ते आळंदी मेट्रो मार्ग सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांना होणारे फायदे, वाहतूक कोंडी कमी होणे, प्रवासाचा वेळ वाचणे तसेच देहू-आळंदी या दोन तीर्थक्षेत्रांमधील प्रवास अधिक सुलभ व सुरक्षित होण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या मागणीबाबत निश्चितच सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन हार्डीकर साहेब यांनी यावेळी दिले. तसेच उपस्थित नागरिकांसमवेत सध्या सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाची माहिती घेत प्रत्यक्ष मेट्रोची सफरही केली. स्थानिक नागरिकांच्या मागण्या, परिसराचा सर्वांगीण विकास आणि भविष्यातील सक्षम वाहतूक व्यवस्था यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू, असा विश्वास नगरसेवक साने यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *