ताज्या बातम्या
मुख्यपृष्ठ
राजकारण
सामाजिक
पत्रकारांनी समाजहितासाठी अधिक जोमाने काम करावे : उपमहापौर शर्मिला बाबर
- August 26, 2026
- Less than a minute
- 27 Views
- 1 month ago
पिंपरी : पत्रकारिता ही केवळ बातमी प्रसिद्ध करण्यापुरती मर्यादित नसून, समाजातील प्रश्नांना वाचा फोडून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची महत्त्वाची जबाबदारी पत्रकारांवर आहे. त्यामुळे नवनिर्वाचित पत्रकारांनी अधिक जोमाने समाजोपयोगी काम करावे. पत्रकारांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास त्यांनी हक्काने संपर्क साधावा, असे आवाहन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले.
ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे म्हणाले, पत्रकार हा समाजाचा आरसा आणि सर्वसामान्यांचा आवाज असतो. समाजातील चांगल्या कामांना प्रसिद्धी देतानाच नागरिकांच्या समस्या निर्भीडपणे मांडण्याचे काम पत्रकारांनी केले पाहिजे. पत्रकारितेच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधून अनेक प्रश्न मार्गी लावता येतात. त्यामुळे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पदाची जबाबदारी ओळखून समाजहिताला प्राधान्य द्यावे.
यावेळी पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण शिर्के, कार्याध्यक्ष प्रवीण (बाबू) कांबळे, महिला अध्यक्षा माधुरी कोराड, महिला उपाध्यक्षा श्रद्धा प्रभुणे, उपाध्यक्ष बद्रीनारायण घुगे, खजिनदार दिनेश दुधाळे, कार्यकारिणी सदस्य सारिका भिंगे, पंकज लालझरे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अनिल भालेराव तसेच सल्लागार बाळासाहेब ढसाळ यांचा सत्कार करण्यात आला.
Share This Post:
Related Post
भोसरी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात
September 26, 2026
रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणाईसाठी “रोजगार महाकुंभ!”
September 26, 2026
पिंपरी चिंचवड मधील कलावंतांची गणेशोत्सवानिमित्त बालगीतांची विशेष निर्मिती
September 26, 2026
कामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
September 26, 2026
शहरात आतापर्यंत ६३ मंडळांवर गुन्हे दाखल
September 24, 2026
स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रम
September 24, 2026