ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ सामाजिक

मातृभूमी प्रतिष्ठान आणि मातृभूमी ढोल ताशा पथकाकडून उत्साहात रक्षाबंधन

मातृभूमी प्रतिष्ठान आणि मातृभूमी ढोल ताशा पथकाकडून उत्साहात रक्षाबंधन

रक्षाबंधन केवळ राखीचा नाही, तर ऋण मानण्याचा दिवस !

उमेश सणस

पिंपरी : रक्षाबंधन केवळ राखीचा नाही, तर ऋण मानण्याचा दिवस आहे. काही नाती रक्ताची नसतात ती कर्तव्य, विश्वास आणि माणुसकीच्या धाग्यांनी जोडलेली असतात. गेली १३ वर्षे जपलेली परंपरा यंदाही मातृभूमी ढोल ताशा पथकातील ताईंनी मनापासून पुढे नेली. दापोडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या पोलीस बांधवांच्या मनगटावर राखी बांधली आणि त्यांच्या सोबत रक्षाबंधन साजरे केले.
ही राखी केवळ एका सणाची परंपरा नव्हती… ती होती त्यांच्या निस्वार्थ सेवेला दिलेली मनापासूनची सलामी. आपण आपल्या कुटुंबासोबत सण साजरे करत असतो, आणि त्याच वेळी कुठेतरी एक पोलीस बांधव आपल्या कुटुंबापासून दूर राहून आपल्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असतो. आपल्या आनंदासाठी त्यांनी कित्येकदा स्वतःचा आनंद बाजूला ठेवला. आपण निर्धास्त झोपावं म्हणून त्यांनी कित्येक रात्री जागून काढल्या. आपण सुरक्षित घरी परतावं म्हणून त्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेची पर्वा केली नाही.
म्हणूनच त्यांच्या मनगटावर बांधलेली प्रत्येक राखी जणू एकच शब्द सांगत होती. तुम्ही फक्त आमचे रक्षक नाही. तुम्ही आमच्या विश्वासाचा आधार आहात.
यावेळी दापोडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस कदम साहेब तसेच सर्व पोलीस बांधव उपस्थित होते. मातृभूमी प्रतिष्ठान आणि मातृभूमी ढोल ताशा पथकाकडून उत्साहात रक्षाबंधन साजरे केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *