ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ

मुळशी धरण 99.66 टक्के भरले

मुळा नदीत रात्री 600 क्यूसेकने विसर्ग सुरू

सकाळी ७:०० वाजता 2000 क्यूसेक

पिंपरी : मुळशी धरण ९९.६६ टक्के भरले आहे. सध्या धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. धरणातील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत रात्री 600 क्यूसेकने विसर्ग सुरू केला असून, तो सकाळी ७:०० वाजता 2000 क्यूसेक करण्यात येईल. तसेच पाऊस वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग बदल करण्यात येईल, आशी माहिती टाटा पॅावर मुळशी धरणाचे सुरेश कोंडूभैरी यांनी दिली.
तरी नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *