ताज्या बातम्या
मुख्यपृष्ठ
राजकारण
व्यवसाय
सामाजिक
शहरात गणेशोत्सवासाठी केवळ १११ गणेश मंडळांना परवाने
- September 12, 2026
- Less than a minute
- 23 Views
- 2 weeks ago
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने शहरातील गणेश मंडळांना परवाने देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालयनिहाय आतापर्यंत एकूण १११ गणेश मंडळांना परवाने देण्यात आले आहेत. तसेच गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरात एकूण १०४ विसर्जन ठिकाणांची व्यवस्था करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. गणेश मंडळांना परवाने देण्यासोबतच विसर्जनासाठी १०४ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा.
Share This Post:
Related Post
भोसरी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात
September 26, 2026
रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणाईसाठी “रोजगार महाकुंभ!”
September 26, 2026
पिंपरी चिंचवड मधील कलावंतांची गणेशोत्सवानिमित्त बालगीतांची विशेष निर्मिती
September 26, 2026
कामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
September 26, 2026
शहरात आतापर्यंत ६३ मंडळांवर गुन्हे दाखल
September 24, 2026
स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रम
September 24, 2026