ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ शिक्षण

संत तुकारामनगर येथील महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयात पालक मेळावा उत्साहात

संत तुकारामनगर येथील

महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयात पालक मेळावा उत्साहात

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील माध्यमिक विद्यालयात पालक मेळावा गुरुवार 20 ऑगस्ट 2026 रोजी 3.30 वाजता विद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक, पालकांचा संवाद वाढवणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता.
विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी. वसावे आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सदर मेळाव्यात Inner Wheel club of Nigdi Pride चे हर्षल जोशी, Plan India च्या प्रतिनिधी स्वाती राऊत, इयत्ता 10 वी वर्गाचे पालक, शिक्षक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे जोशी यांनी व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन केले. स्वाती राऊत यांनी school rennovation बाबत माहिती दिली. संतोष चेमटे यांनी अभ्यास कसा करावा, मोबाइलचा वापर कसा टाळावा याविषय मार्गदर्शन केले. प्रतिभा थोरात यांनी पालकांनी मुलांशी कसा संवाद साधावा हे पटवून सांगितले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सय्यद गुलजार यांनी आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगती बद्दल व अडचणी बद्दल शिक्षकांची खुला संवाद साधला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गजानन मकासरे, पवनकुमार मानकर, शीतल चिंचोली यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रतिभा थोरात यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने मेळाव्याची सांगता झाली. या यशस्वी आयोजनामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *