ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण

सामाजिक उपक्रमांनी शशिकांत आप्पा कदम यांचा वाढदिवस साजरा

सामाजिक उपक्रमांनी शशिकांत आप्पा कदम यांचा वाढदिवस साजरा

आरोग्य शिबिर, गरजूंना मदती हात

१,२२५ एसटी NCMC स्मार्ट कार्डचे मोफत वाटप

 

– उमेश सणस

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे पिंपळे गुरव येथील नगरसेवक शशिकांत आप्पा कदम यांचा वाढदिवस यंदा केवळ उत्सव म्हणून न साजरा करता विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. आरोग्य शिबिर, क्षयरुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप, अंध-अनाथ मुलांना कपडे व खाऊ, मोफत चष्मे तसेच रक्तातील घटकांच्या मोफत चाचण्या अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
वाढदिवसाच्या कार्यक्रमाला चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित राहून शशिकांत कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले.
वाढदिवसानिमित्त ऊरो रुग्णालयातील क्षयरुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. तसेच ममता अंध अनाथ कल्याण केंद्रातील मुलांना कपडे व खाऊचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांना लाभ मिळावा यासाठी मोफत आरोग्य तपासणी व चष्मे वाटप करण्यात आले. रक्तातील विविध घटकांच्या चाचण्याही मोफत करण्यात आल्या. त्यामुळे अनेक नागरिकांनी या आरोग्य उपक्रमाचा लाभ घेतला. दरम्यान, नागरिकांच्या सोयीसाठी आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय एसटी NCMCस्मार्ट कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल १,२२५ स्मार्ट कार्डचे मोफत वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा खर्च सामाजिक उपक्रमांसाठी वापरून गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *