भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात मंगल पांडे यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाची ठिणगी पेटवण्यात त्यांच्या बंडखोर भूमिकेचा महत्त्वपूर्ण वाटा मानला जातो.
मंगल पांडे यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात धैर्याने आवाज उठवला. त्यांच्या शौर्याने आणि बलिदानाने पुढील स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा मिळाली.
त्यांच्या जयंतीनिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या या महान क्रांतिकारकाला विनम्र अभिवादन.
शौर्य, त्याग आणि देशभक्तीला सलाम! 🇮🇳
— City Vedh | सिटी वेध