सामाजिक ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ

सांगवी विकास मंचच्या वतीने संतश्रेष्ठ नरहरी सोनार महाराज यांचा जयंती उत्सव

सांगवी विकास मंचच्या वतीने संतश्रेष्ठ नरहरी सोनार महाराज यांचा जयंती उत्सव

पिंपरी : सांगवी येथील सांगवी विकास मंचाच्या वतीने संतश्रेष्ठ श्री नरहरी सोनार महाराज यांचा जयंती उत्सव २५ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. याप्रसंगी मोठ्या संख्येने भाविक तसेच समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आरंभी उपस्थित मान्यवरांचे हस्ते संत नरहरी महाराज यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून यथोचित पूजा करण्यात आली. सुवर्णकार समाजाचे जेष्ठ नेते दिलीपकुमार फाकटकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करुन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
विशेष म्हणजे याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जेष्ठ प्रवचनकार ह.भ.प. बब्रुवाहन महाराज यांनी संत नरहरी सोनार महाराज यांचे चरित्र अत्यंत भावस्पर्शी शब्दांत प्रगट करतात संत नरहरी महाराज यांचे जीवनप्रवाहातील अनेक मौलिक प्रसंगांचे दाखले दिले. ह.भ.प. वाघ महाराज यांचे धार्मिक व सामाजिक कार्याबद्दल तसेच संत नरहरी सोनार महाराज यांचे चरित्रावर अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात प्रामुख्याने जेष्ठ नागरिक संघ सांगवी, परिसरचे भूतपूर्व अध्यक्ष अशोकराव भोसले, ह.भ.प. बाळासाहेब शितोळे, खादी ग्रामोद्योग समूहाचे मा. संचालक सुनील पोकरे, जेष्ठ उद्योजक भरतशेठ कुंभार, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड, बाळकृष्ण गिरगुणे, संत साहित्याचे अभ्यासक जयप्रकाश नारायण खोत, जेष्ठ किर्तनकार ह.भ.प. बंडोपंत शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुख्य अतिथी ह.भ.प.बाळासाहेब शितोळे, अशोकराव भोसले, महेशशेठ भागवत, जेष्ठ पत्रकार प्रकाश जमाले, साहित्यिक मुरलीधरपंत दळवी यांनी आदरणीय ह.भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज यांना शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी जेष्ठ पत्रकार प्रकाश जमाले, जेष्ठ नागरिक संघाचे मा.अध्यक्ष रामचंद्र सपकाळ, मा. पोलिस अधिकारी सुनील कदम, मदन चांदेकर, अरुण लांडे, विश्वनाथ हिरेमठ, विनायक अल्हाट, कृष्णकांत गिरगुणे, भरतशेठ कुंभार, मुरलीधर दळवी, राजेंद्र लक्ष्मण कोल्लम, संजय तरटे, अशोक बेल्हेकर, दत्तात्रेय राऊत, दत्तात्रेय पवार, विजयकुमार मोहिते, अशोक जमाले, प्रदीप देशमुख, अरुण खटावकर, लक्ष्मीकुमार माळवदे, भरतशेठ कुंभार, याशिवाय अनेक मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सांगवी विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष महेशशेठ भागवत यांनी केले. सांगवी विकास मंचचे सदस्य दिलीपकुमार फाकटकर यांनी सर्वांचे आभार मानले. शेवटी सामुहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *