ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण व्यवसाय सामाजिक

तपोधन नागरी सहकारी पतसंस्थेच्या निगडी शाखेचे उद्घाटन

तपोधन नागरी सहकारी पतसंस्थेच्या निगडी शाखेचे उद्घाटन

महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते फीत कापून पतसंस्थेचे उद्घाटन

उमेश सणस
पिंपरी : तपोधन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितच्या निगडी प्राधिकरण येथील दुसऱ्या शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते उद्घाटनाची फीत कापून शाखेचा शुभारंभ करण्यात आला. यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, पतसंस्थेचे पदाधिकारी, सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास आ. अश्विनीताई जगताप, आ. अमित गोरखे, आ. उमाताई खापरे, महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी पतसंस्थेच्या नवीन शाखेच्या शुभारंभाबद्दल पदाधिकारी व संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या.
या वेळी संस्थेचे संस्थापक तथा चेअरमन बाळासाहेब लांडे, व्हाईस चेअरमन माऊली थोरात, तज्ञ संचालक सुनील लांडगे, रमाकांत स्वामी, व्यवस्थापक प्राजक्ता आंगणे तसेच संचालक मंडळातील बाबासाहेब लांडगे, बाळासाहेब जवळकर, संतोष तळेकर, विकास विधाते, शिवजी पटेल, पद्मा कासकर, लका दौंडकर उपस्थित होते. तसेच सल्लागार समितीचे ॲड. बापूसाहेब थोरात, शैलेश पाटील, पांडुरंग भाईप, रमाकांत लांडगे, गणेश संभेराव, असलम तांबोळी आणि मोहिनी जगताप यांचीही उपस्थिती होती.
निगडी प्राधिकरण परिसरात पतसंस्थेची शाखा सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना आर्थिक व्यवहारांसाठी अधिक सोयीचे ठिकाण उपलब्ध झाले आहे. या शाखेच्या माध्यमातून नागरिकांना विश्वासार्ह आर्थिक सेवा, कर्ज सुविधा तसेच विविध बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पतसंस्थेने आतापर्यंत ग्राहकांचा विश्वास संपादन केला असून, नवीन शाखेच्या माध्यमातून निगडी परिसरातील नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे आर्थिक सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. उद्घाटन सोहळ्यानिमित्त उपस्थित मान्यवरांनी संस्थापक, चेअरमन, संचालक मंडळ आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन करून नवीन शाखेच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *