आरोग्य ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण शिक्षण सामाजिक

विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा धडा

विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा धडा

मानवी साखळीतून नागरिकांमध्ये जनजागृती

उमेश सणस
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘इ’क्षेत्रीय कार्यालय, प्रभाग क्रमांक ५ येथील एसपीजी इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आळंदी रोड, भोसरी येथील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेश प्रतिमा तयार करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तसेच मानवी साखळीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करत हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला.
महापौर रवि लांडगे, उप महापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा ७.० तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२६ अभियानांतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.
गणेशोत्सवात प्लास्टिकचा वापर टाळावा, नैसर्गिक व पर्यावरणपूरक सजावटीला प्राधान्य द्यावे आणि परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी हरित शिक्षक शपथ घेण्यात आली तसेच स्वच्छतेच्या घोषणांद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *