ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण शिक्षण सामाजिक

जनगणनेत ओबीसीचा रकाना समाविष्ट करा

जनगणनेत ओबीसीचा रकाना समाविष्ट करा

पटोले, माळी यांच्यासह काँग्रेस शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली मागणी

उमेश सणस
पिंपरी : केंद्र सरकारकडून होऊ घातलेल्या जातनिहाय जनगणनेत ओबीसी प्रवर्गाचा रकाना समाविष्ट करण्यात आलेला नाही. जनगणनेत जात उल्लेखासह ओबीसी प्रवर्गाचा तक्ता समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस नेते आ. नानाभाऊ पटोले, प्रा. भानुदास माळी यांच्या नेतृत्वातील काँग्रेस शिष्टमंडळाने राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांच्याकडे केली.
काँग्रेस नेते तथा माजी प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले, काँग्रेस ओबीसी विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भानुदास माळी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या प्रमुख ओबीसी नेत्यांचे शिष्टमंडळ शुक्रवारी (दि. ११) महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णूजीदेव वर्मा यांची मुंबईतील राजभवन येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. राज्यपालांशी सुमारे अर्धा तास झालेल्या बैठकीतून ओबीसी समाजाच्या विविध बाबीवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रा. भानुदास माळी यांनी प्रास्ताविकातून ओबीसींच्या सर्व बाबींचा ऊहापोह मांडला. आ. नाना पटोले यांनी ओबीसी व शेतकऱ्यांच्या अडचणींचा पाढा वाचला तर डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी एसआयआर आणि जनगणनेत वडार समाजासह भटके विमुक्त जमातीवर स्थलांतरामुळे मोठा अन्याय होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. या बैठकीत ओबीसींच्या जनगणना, शिष्यवृत्ती, नोकर भरती पदोन्नती आदि विविध प्रश्नांवर सर्वांकडून सखोल चर्चा करण्यात आली. राजभवनात पार पडलेल्या या बैठकीसाठी महाराष्ट्रभरातून विविध जिल्ह्यातील ३२ प्रतिनिधी उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ. श्रावण रॅपनवाड, सचिव धनराज राठोड, किशोर कन्हेरे, अनंतराव मोहोड, मंगलताई भुजबळ, ॲड. शुभांगी शेरेकर, संजय तडाके, राजू घुटे, विनोद अहिरकर,विजय राऊत, विमल कटरे, शैलेश राऊत, अशोक खालने, दिगंबर राऊत तसेच पिंपरी चिंचवड काँग्रेसचे ओबीसी विभाग प्रमुख सोमनाथ शेळके आदी प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांनी सर्व प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेऊन ओबीसींच्या प्रश्नावर लक्ष देण्याचे अभिवचन देऊन आश्वस्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *