ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण व्यवसाय सामाजिक

अनधिकृत जाहिरात फलकावर कारवाई

अनधिकृत जाहिरात फलकावर कारवाई

महापालिका आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून मोहीम

उमेश सणस

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील जाहिरात फलक महानगरपालिका (आकाशचिन्ह व स्कायसाईन) व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन व नियंत्रण नियम २०२२ चे अधिनिर्गत तरतुदीनुसार महापालिकेची पुर्व परवानगी घेऊनच खासगी जागेत जाहिरात फलक उभा करणेची तरतुद आहे. पिंपरी चिंचवड हे शहर देशपातळीवरती औद्योगिक शहर म्हणुन ओळखले जाते. सध्या पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यानुसार शहराचे सौदर्य अबाधित राखणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये महानगरपालिकेची पुर्व परवानगी न घेता जाहिरात फलक उभे केले जातात, त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नात देखील घट होत आहे. यास्तव शहराच्या सौंदर्यात आणि महसुलात वाढ व्हावी याकरिता अनधिकृत जाहिरात फलकावर प्रतिबंध व नियंञण म्हणून आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत अनधिकृत जाहिरात फलकांची स्थळ पहाणी करून ते तातडीने निष्कासित करण्याची मोहिम व कारवाई सद्यस्थितीत शहरात सुरू आहे.
मागील महिन्यामध्ये ताथवडे येथील अनधिकृत जाहिरात फलक, तसेच थरमॅक्स चौक, समर्थ सहकारी बॅकेच्या इमारतीवरील तसेच सर्व्हे नं,१७५/९,काळीभित रोड, चोवीसावाडी येथील अनधिकृत जाहिरात फलक निष्कासित करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये ताथवडे रोड, विष्णूदेव नगर, पुनावळे येथे अनधिकृतपणे ४०×३० आकाराचा जाहिरात फलक उभा केलेचे निदर्शनास आल्याने, आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत उप आय़ुक्त (परवाना) राजेश आगळे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रस्तुत जाहिरात फलक मंगळवार (दि. २२) रोजी कारवाई करून (लोखंडी स्टक्चरसह) निष्कासित करण्यात आला आहे. तरी कोणीही अनधिकृत जाहिरात फलक उभारू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *