ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण सामाजिक

उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी

उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी

कृष्ण-राधा रॅम्प वॉक, नृत्याविष्कार, ५६ भोग आणि दहीहंडीने रंगला भक्तिमय सोहळा

उमेश सणस
पिंपरी : उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव ५ सप्टेंबर रोजी पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या परिसरात मोठ्या उत्साहात, आनंदात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून आयोजित या महोत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव, कृष्ण-राधा रॅम्प वॉक, आकर्षक नृत्याविष्कार, शोभा टीमसोबत कृष्ण-राधेचे विशेष नृत्य, भव्य ५६ भोग अर्पण तसेच बालकृष्णासोबत दहीहंडीचा आनंदोत्सव यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
‘आला रे आला, गोविंदा आला’ आणि ‘गवळ्याच्या पोरींनो, जरा मडकी सांभाळा’ अशा पारंपरिक गजराने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. महिला, बालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याचा आनंद घेतला. या प्रसंगी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा चिंचवड विधानसभा महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भक्ती, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोपा यांचा सुंदर संगम या महोत्सवातून अनुभवायला मिळाला. या संपूर्ण महोत्सवामुळे पिंपळे सौदागर परिसरात भक्ती, संस्कृती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी , उन्नती सखी मंच, उन्नती सोशल फाउंडेशनच्या सदस्य पिंपळे सौदागरमधील नागरिक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीकृष्ण जन्माष्टमी हा आपल्या संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि आनंदाचा उत्सव आहे. भगवान श्रीकृष्णांच्या विचारांमधून प्रेम, सद्भावना, कर्तव्य आणि मानवतेचा संदेश मिळतो. हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता आपल्या संस्कृतीशी आणि परंपरांशी नव्या पिढीला जोडणारा ठरावा, या उद्देशाने उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद ही आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहे. भविष्यातही सामाजिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून समाजाशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
– डॉ. कुंदाताई संजय भिसे, अध्यक्षा उन्नती सोशल फाउंडेशन तथा चिंचवड विधानसभा महिला मोर्चा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *