आरोग्य
ताज्या बातम्या
मुख्यपृष्ठ
राजकारण
वैद्यकीय
सामाजिक
जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी : आमदार शंकर जगताप
- September 10, 2026
- Less than a minute
- 11 Views
- 3 weeks ago
पिंपरी : जिल्हा रुग्णालयात २०० खाटांचे अत्याधुनिक सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यास मंत्रिमंडळाने (दि. ८) मंजुरी दिली आहे. या रुग्णालयासाठी ७७२ पदांची निर्मिती, अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री, पायाभूत सुविधा आणि निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे, अशी माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयात २०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यास मंत्रिमंडळाने दिलेली मंजुरी हा सर्वसामान्य रुग्णांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा रुग्णालय आधुनिक, सक्षम आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण ‘सुपरस्पेशालिटी’ केंद्र म्हणून विकसित होत आहे. पदनिर्मिती, निधी आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीबाबत घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे गंभीर आजारांवरील दर्जेदार उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील. या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, तो निर्धारित वेळेत पूर्ण व्हावा यासाठी पुढेही प्रयत्नशील राहणार आहे.
Share This Post:
Related Post
भोसरी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात
September 26, 2026
रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणाईसाठी “रोजगार महाकुंभ!”
September 26, 2026
पिंपरी चिंचवड मधील कलावंतांची गणेशोत्सवानिमित्त बालगीतांची विशेष निर्मिती
September 26, 2026
कामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
September 26, 2026
शहरात आतापर्यंत ६३ मंडळांवर गुन्हे दाखल
September 24, 2026
स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रम
September 24, 2026