आरोग्य ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण शिक्षण सामाजिक

पिंपळे गुरव येथे “माझा बाप्पा” शाडूमाती गणेश मूर्ती कार्यशाळे’चे आयोजन

पिंपळे गुरव येथे “माझा बाप्पा” शाडूमाती गणेश मूर्ती कार्यशाळे’चे आयोजन

आमदार जगताप यांनी साकारली शाडूमातीपासून गणेशमूर्ती

उमेश सणस
पिंपरी : पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालय येथे “माझा बाप्पा” शाडूमाती गणेश मूर्ती कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सव हा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. या संस्कृतीची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवतानाच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घराघरात पोहोचावा, या उद्देशाने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाला बालकलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपल्या छोट्या हातांनी, स्वतःच्या कल्पकतेतून आणि भक्तिभावातून प्रत्येक मुलाने सुंदर गणेशमूर्ती साकारली. मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यात पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव निर्माण करणे आणि आपल्या संस्कृतीशी त्यांची नाळ अधिक घट्ट जोडणे, हे या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्ट होते.
या कार्यशाळेचे विशेष आकर्षण म्हणजे मार्गदर्शक कार्यक्षम आमदार शंकर जगताप यांनी स्वतः सहभागी होत शाडूमातीपासून गणेशमूर्ती साकारली. मुलांसोबत बाप्पाला आकार देत त्यांनी या उपक्रमाचा आनंद घेतला. लोकप्रतिनिधी म्हणून विकासकामांसोबतच सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची त्यांची भूमिका या सहभागातून अधोरेखित झाली. मला ही या कार्यशाळेत सहभागी होत स्वतःच्या हातांनी शाडूमातीपासून गणेशमूर्ती साकारण्याचा आनंद घेता आला. मुलांसोबत संवाद साधताना, त्यांची कला पाहताना आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवताना मनाला खूप समाधान मिळाले, आशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या वेळी नगरसेवक शशिकांत कदम, श्याम जगताप, माऊली जगताप आदि उपस्थित होते.
मुलांच्या हातून सकरलेला बाप्पा म्हणजे केवळ मूर्ती नाही; तो संस्कृतीचा वारसा आहे. मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यात पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे.
– पल्लवी महेश जगताप, नगरसेविका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *