आरोग्य ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण शिक्षण सामाजिक

मराठवाडा जनविकास संघातर्फे भंडारा डोंगराच्या पायथ्याशी वृक्षारोपण

मराठवाडा जनविकास संघातर्फे भंडारा डोंगराच्या पायथ्याशी वृक्षारोपण

उमेश सणस
पिंपरी : निसर्गाचा समतोल राखणे, वाढते प्रदूषण रोखणे आणि भावी पिढीसाठी हिरवेगार व सुरक्षित भविष्य निर्माण करण्याच्या संकल्पनेतून मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने जांबवडे, भंडारा डोंगर पायथा येथे १ हजार रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. एक झाड म्हणजे केवळ हिरवाई नव्हे, तर ते भविष्यातील श्वासाची हमी आहे, या भावनेतून उपस्थितांनी वृक्षारोपणाचा संकल्प केला.
श्री संत तुकाराम महाराज विठ्ठल-रखुमाई भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्ट, मराठवाडा जनविकास संघ, गुणवंत कामगार कल्याण मंडळ, नवचैतन्य हास्ययोग परिवार, भारतीय योग संस्थान, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ, जनकल्याण प्रतिष्ठान, भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघ, अ रे ऑफ होप चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी ह.भ.प. बाळासाहेब काशीद पाटील (अध्यक्ष, श्री संत तुकाराम महाराज विठ्ठल-रखुमाई भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्ट व सर्व विश्वस्त मंडळ,), शशिकांत शिंदे ( सरपंच इंदोरी), तानाजी नाटक (सरपंच, जांबवडे), दिलीप नामदेव ढोरे (पंचायत समिती सदस्य गटनेते), जगन्नाथ नाटक (श्री संत तुकाराम महाराज विठ्ठल-रखुमाई भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्ट) जोपाशेठ पवार (सचिव, श्री संत तुकाराम महाराज विठ्ठल-रखुमाई भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्ट), अरविंद शेवकर (माजी चेअरमन, वि. का. सोसायटी व भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्ट), ह भ प रामभाऊ कराळे प्रकाश शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी, वडगाव मावळ, ह भ प बाळकृष्ण भोरकडे, मल्लिनाथ हिरेमठ – वनपरिक्षेत्र अधिकारी, वडगाव, डॉ. भारतीताई चव्हाण – संस्थापक/अध्यक्ष, गुणवंत कामगार कल्याण मंडळ, अरुण पवार – छत्रपती शिवाजी महाराज वनश्री (महाराष्ट्र शासन) वृक्षमित्र राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त तथा समाजभूषण पुरस्कार प्राप्त, मंगल बबन दाते/ढोरे – नियत क्षेत्र वन अधिकारी, निगडे, रमेश ठोंबरे – वनाधिकारी निगडे, बाळासाहेब साळुंके, मोहम्मदशरीफ मुलानी, डॉ. नंदकुमार धुमाळ, दिनेश पवार, पांडुरंग सुतार, शंकरराव सावंत, शिवाजी साळुंखे, प्रकाश इंगोले, महादेव स्वामी, किशोर अट्टरगेकर उपस्थित होते.

वृक्ष हे निसर्गाचे प्राणवायू देणारे अमूल्य साधन

वृक्ष हे निसर्गाचे प्राणवायू देणारे अमूल्य साधन असून, आज मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन केले नाही तर भविष्यात पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे झाड लावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते जगवणेही महत्त्वाचे आहे, असे आवाहन मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी केले.

वृक्षारोपणाचा उपक्रम एका दिवसापुरता मर्यादित न राहता त्याचे संवर्धन करा

जगन्नाथ नाटक पाटील यांनी पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. वृक्षारोपणाचा उपक्रम एका दिवसापुरता मर्यादित न राहता त्याचे सातत्याने संवर्धन झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नागरिकांनी एकत्र येऊन पर्यावरणासाठी काम करावे

डॉ.भारतीताई चव्हाण यांनी समाजातील विविध संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन पर्यावरणासाठी काम करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. तानाजी नाटक यांनी सामाजिक सहभागातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *