ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ व्यवसाय सामाजिक

महावितरणच्या वतीने सेतू अभियान उपक्रम

महावितरणच्या वतीने सेतू अभियान उपक्रम

उमेश सणस
पिंपरी : MNREगाईडलाइननुसार 17 सप्टेंबर 2026 ते 17 ऑक्टोबर 2026 पर्यंत सेवा सेतू अभियान उपक्रम महावितरणच्या वतीने सर्व तहसील कार्यालय, महानगरपालिका कार्यालय या ठिकाणी राबविला जात आहे. सर्व ठिकाणी किऑस्क लावून स्मार्ट रूफ टॉप योजना, पीएम सूर्य घर योजना याविषयी ग्राहकांना तसेच लोकप्रतिनिधींना माहिती दिली जात आहे.
वीज ग्राहकांना सोलर रूफ टॉप सिस्टीम बसविण्याकरता मार्गदर्शन केले जाते. कर्ज पुरवठा करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी तसेच सोलर वेंडर ही त्या ठिकाणी उपलब्ध असतात. आज रोजी पिंपळे गुरव येथील नगरसेवक माऊली जगताप तसेच तृप्ती कांबळे यांनी ह प्रभाग येथे सेवा सेतू अभियानाला भेट देऊन योजनांची माहिती घेतली. त्या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र महावितरणचे सहायक अभियंता संतोष पंचरस, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्यवस्थापक चक्रवर्ती साहेब, सोलर व्हेंडर झोडगे हेही उपस्थित होते.
पीएम सोलर घर योजनेअंतर्गत तीन कि वॅट करिता 78 हजार रुपये इतके शासकीय अनुदान मिळत असून, ग्राहकांनी त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच स्वयंपूर्ण महाराष्ट्र रूफ टॉप योजनेअंतर्गत बीपीएल ग्राहक , अनुसूचित जाती जमातीतील वीज ग्राहक यांचा वापर 100 युनिट पेक्षा कमी आहे अशा ग्राहकांना पाच हजार रुपयांमध्ये व सर्वसाधारण गटातील वीज ग्राहकांना दहा हजार रुपयांमध्ये एक किलो वॅट सोलर सिस्टिम देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *