ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ शिक्षण सामाजिक

लातूर येथील श्री गुरु गणेश ग्रंथालयासाठी प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया यांची पुस्तकांची भेट

लातूर येथील श्री गुरु गणेश ग्रंथालयासाठी प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया यांची पुस्तकांची भेट

 

उमेश सणस
पिंपरी : लातूर येथे श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या अंतर्गत श्री गुरु गणेश ग्रंथालय अनेक वर्षापासून चालू आहे. या ग्रंथालयामध्ये सुमारे 35 हजार पेक्षा जास्त ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध आहेत. लातूर जिल्ह्यातील एक भव्य ग्रंथालय म्हणून या ग्रंथालयाची प्रसिद्धी आहे. या ग्रंथालयासाठी पुणे येथील सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील जेष्ठ कार्यकर्ते डॉ. प्रा. अशोककुमार पगारिया यांनी आपल्या वैयक्तिक ग्रंथालयातील 50 पुस्तके भेट दिली आहेत.
सामाजिक, धार्मिक आणि प्रबोधनात्मक साहित्य असणारी ही पुस्तके लातूर येथील वाचकांसाठी निश्चित वाचनासाठी पर्वणी ठरणार आहे. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ लातूर या संस्थेचे अध्यक्ष सीए सुनीलजी कोटेचा, सुनीलजी बेदमुथा आदि कार्यकर्त्यांनी या पुस्तकांचा स्वीकार केला . बदनापूर जालना या ठिकाणी महाराष्ट्र प्रवर्तिनी परमपूज्य प्रतिभाजी महासतीजी यांच्या सानिध्यात आणि तेथील संस्थेचे पदाधिकारी अशोकजी कोठारी, राजेंद्रजी पोखरणा, रसिकजी नहार , नितीनजी बेदमुथा यांच्या प्रमुख उपस्थितीत ही ग्रंथभेट देण्यात आली.
श्री गुरु गणेश ग्रंथालय लातूर या संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रजी सुराणा राजेंशजी डुंगरवाल, विशाल पोखरणा, कल्पेश ओसवाल अनिल डुंगरवाल आदी पदाधिकाऱ्यांशी लातूर येथील एका कार्यक्रमांमध्ये प्रा अशोककुमार पगारिया यांनी ग्रंथ भेट देण्याविषयी चर्चा केली होती. त्यानुसार ही ग्रंथ भेट देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *